ॲड. परशुराम चव्हाण यांचा यशस्वी युक्तिवाद
लांजा तालुक्यातील कोर्ले येथे रुपये २४,००,०००/- (रुपये चौवीस लाख मात्र) चा गोवा बनावटीचा मद्यसाठा मुद्देमाल जप्त केला आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क लांजा विभागाने मद्यसाठा जप्त केला. गोव्याहून मुंबईचा दिशेने मद्याची अवैध वाहतूक करणा-या वाहकाला सापळा रचून पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क लांजाच्या पथकाला यश आले. ही कारवाई बुधवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजण्याचा सुमारास करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
आरोपींना दि. २६/०४/२०२३ रोजी अटक करून लांजा येथील मे. कोर्टासमोर रिमांड रिपोर्टसह हजर करुन त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी मागण्यात आली. त्यावेळी आरोपी तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून पोलीस कोठडीची मागणी नाकारुन आरोपी यास न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.
आरोपी तर्फे मे. न्यायालयात अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करून, त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून आरोपी याची रक्कम रु.२५,००० /- (रुपये पंचवीस हजार मात्र ) च्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण व अॅड. ओंकार कुलकर्णी यांनी काम पाहिले.