You are currently viewing सोशल मीडिया, युट्युब च्या जमान्यात ही कीर्तन हे प्रभावी माध्यम – आ. नितेश राणे

सोशल मीडिया, युट्युब च्या जमान्यात ही कीर्तन हे प्रभावी माध्यम – आ. नितेश राणे

कणकवली

सोशल मीडिया, युट्युब च्या जमान्यात वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण सगळी माध्यमे वापरतो. पण आजही छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर कीर्तन हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन भाजपा आ.नितेश राणे यांनी केले.
शिवरायांचा खरा इतिहास हा प्रत्येक पिढीपर्यंत हा गेला पाहिजे आणि समजलाच पाहिजे. कोण इतिहासाच्या निमित्ताने चुकीची माहिती मांडतात. कोण बोलतोय छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर कोण अफजल खान, औरंगजेब यांच्या विचारांचा उदोउदो करत आहेत. या हिंदू विरोधी विचारांना मोठ करण्याचं काम चाल आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये,या सगळ्या वातावरणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय घराघरात पोचविण्याचा उपक्रम हत्वाचा आहे.असेही ते म्हणाले.

संस्कृती संवर्धन मंच कणकवली यांच्यावतीने कणकवली विद्यामंदिर हास्कुल च्या मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या कीर्तन मोहत्सवाचे आयोजन केले आहे त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीप परज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प.श्री.चारुदत्त आफळे बुवा हे कीर्तन करणार आहे.त्यांचा यावेळी आमदार राणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी,नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,डॉ. राजश्री साळुंखे, भाजपा जिल्हा सचिव मनोज रावराणे,संस्कृती संवर्धन मंच अध्यक्ष दीपक बेलवलकर,डॉ.संदीप साळुंखे,प्रसाद देवस्थळी,विलास खानोलकर परशुराम झगडे,सुहास हर्णे, प्रा.हरिभाऊ भिसे,संजय राणे,राजेंद्र तवटे, ह.भ. प. विश्वनाथ गवडळकर,दादा कोरडे,आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा म्हणून मला खऱ्या अर्थाने आज समाधान वाटलं आहे.माझ्या मतदारसंघांमध्ये, माझ्या कणकवलीमध्ये कीर्तन महोत्सव होतोय.तोही छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आहे हे आमचे भाग्य आहे.या मोहत्सवात दहा हजार पेक्षा जास्त कीर्तन केले असे ह.भ. प. किर्तन करणार, आपले विचार मांडनार याचा फायदा येणाऱ्या पिढीला नीच्छित होणार आहे.असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =