सावंतवाडी
येथील कामगार कल्याण केंद्रात वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग २ ते २० मे या कालावधीत येथील जिमखाना मैदान परिसरातील पालिकेच्या इमारतीत घेण्यात येणार आहेत. तरी जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, येथील कामगार कल्याण केंद्रामार्फत विविध प्रकारची फुले, टेडीबेयर, कुत्रा, सिंड्रेला बाहुली बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिमखाना मैदानावरील नगरपालिकेच्या इमारतीत हे वर्ग सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१२६४८०० या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र प्रमुखांकडून करण्यात आले आहे.