युवक-युवतींकडून लाखोंचा गंडा; भाजप आक्रमक, न्याय मिळवून देणार…
दोडामार्ग
गेले अनेक दिवस दोडामार्ग तालुक्यात फायनान्सच्या माध्यमातून कर्ज मंजूर करून देतो असे सांगून एका ” ग्रुप” च्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. युवक आणि युवतीने मिळून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समजते. त्यांनी येथे गेले चार महिने कार्यालयही सुरु केले होते, अशी माहिती ही पुढे येत आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून लोन करून देतो. त्यासाठी काही हजाराच्या दरात रक्कम आकारून व कोणतीही कागदपत्रे न घेता मोठ्या लोनची स्वप्ने दाखवत तालुक्यातील अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, त्यापैकी काही पिडीतांनी आज दोडामार्ग नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आपली गाऱ्हाणी मांडली. या सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असून ह्या “त्या” ग्रुप व फायनान्स नावाच्या कंपनीने तालुक्यातील भोळ्या-भाबड्या जनतेला फसवण्याचा काम केलेलं असून पोलीस प्रशासनाला या मागील सूत्रधार शोधून काढून त्यांना योग्य ती शिक्षा देणे व ज्या लोकांनी या लोन स्कीमसाठी पैसे भरले आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे चेतन चव्हाण यांनी सांगितले.
प्रोसेसिंग फी च्या नावाखाली रक्कम स्वीकारल्याची पावती देण्यात आली आहे. मात्र त्यावर रजिस्ट्रेशन नंबर तसेच गृपचा मूळ पत्ता नसून या ठगांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे.या प्रकरणात तालुक्यातील एक तरुणी सहभागी असल्याचा संशय असून काही लोकांनी “त्या” तरुणी मार्फत पैसे गुतवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी “त्या” तरुणी कडे संबधित फसवणूक झालेले लोक गेले असता आपण ती रक्कम दुसऱ्याकडे म्हणजे अन्य एका गृपच्या” संचालकाकडे दिल्याचे तिचे म्हणणे आहे. तो मालवण तालुक्यांतील असल्याची चर्चा आहे.