You are currently viewing सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा कट्टा केंद्राचा निकाल जाहीर

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा कट्टा केंद्राचा निकाल जाहीर

मालवण

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२३ मध्ये कट्टा केंद्रावर दुसरी, तिसरी, चौथी, सहावी, सातवी या वर्गातून एकूण १२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुसरीमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य, १ ब्राँझ, तिसरीमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य, चौथीमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य, २ ब्रॉंझ, सहावीमध्ये १ रौप्य, १ ब्राँझ, तर सातवीमध्ये १ रौप्य अशी एकूण २० पदके विद्यार्थ्यांनी प्राप्त केली.

या गुणवत्ता पदकांमध्ये दुसरी- सुवर्ण पदक- रुद्र महेश भाट, हर्षित यशवंत मालवदे (दोन्ही केंद्रशाळा कट्टा), शुभ्रा राजन नाईक (जि. प. शाळा पेंडुर नं. १) रौप्य पदक- सोहम संदीप मसुरकर (केंद्रशाळा कट्टा), गायत्री संतोष म्हापणकर (जि. प. शाळा पेंडुर नं. १), ब्राँझ पदक- गार्गी घनःश्याम राणे (जि. प. शाळा पेंडुर नं. १ ), तिसरी – सुवर्ण पदक- गिरीजा राजेंद्र नाईक (जि. प. शाळा कुणकवळे), मानसी प्रफुल्ल पवार (जि. प. शाळा कुणकवळे), शंकर विलास सरनाईक (जि. प. केंद्रशाळा, नांदरुख-आंबडोस), ब्राँझ पदक देवांग देवेंद्र बांदेकर (केंद्रशाळा . कट्टा), समृद्धी सहदेव गावडे (जि. प. शाळा पेंडुर नं. १ ), अनन्या अनिल पाटील (जि. प. केंद्रशाळा पेंडुर नं. १ ), इयत्ता चौथी सुवर्ण पदक काव्य अभिमन्यू मेस्त्री (जि. पू. केंद्रशाळा, कुणकवळे), रौप्य पदक भूमी दिनेश परब, सान्वी शैलेश परब (जि. प. केंद्रशाळा पेंडुर नं. १), ब्राँझ पदक -अनुश्री राजेंद्र गोसावी (जि. प. केंद्रशाळा कट्टा), रोहिलकर मिहीर सागर (जि. प. केंद्रशाळा कट्टा), सहावी- रौप्य पदक-रोहिलकर ओंकार सागर ( वराडकर हायस्कूल कट्टा), ब्राँझ पदक – यामिनी नित्यानंद म्हाडगूत ( वराडकर हायस्कूल कट्टा), सातवी – रौप्य पदक समृद्धी विलास सरनाईक (जि. प. केंद्रशाळा, नांदरुख आंबडोस.)

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हे प्रथमच सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेसाठी मंजूर केले. कट्टा एसटीएस परीक्षा केंद्र संचालक म्हणून प्रकाश विठोबा कानूरकर यांनी काम पाहिले. कट्टा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी मालवण येथे जावे लागत असे. त्यामुळे कट्टा केंद्र झाल्याने विद्यार्थी व पालक आनंदित होते. अशाप्रकारे विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासाठी वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे व मुख्याध्यापक संजय नाईक यांनी प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा