बांदा
ग्रामीण भागातील त्यात मुख्यत्वे शेतकरी वर्गातील मुलांना संगणकचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डिजिटल काळात आपला पाया भक्कम असल्यास भविष्यात मुलांना संगणक विषय प्रश्न निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग परिपूर्ण शिक्षणासाठी करावा असे आवाहन माजी विद्यार्थी सुभाष पंडित यांनी केले.
जि. प. कास शाळा नंबर 1 या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले सुभाष पंडित यांनी शाळेची गरज ओळखून तीन संगणक संच आणि प्रिंटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मिळवून दिले. यावेळी ते बोलत होते. संगणक व प्रिंटर शाळेला नुकताच प्रदान करण्यात आले. कास सरपंच प्रवीण पंडित, उपसरपंच गजानन पंडित, काशिनाथ पंडित, रमेश पंडित, पांडुरंग पंडित, श्रीकांत पंडित तसेच मुख्याध्यापिका नाईक, शिक्षक स्वाती पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुभाष पंडित यांनी शाळेला संगणक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.