You are currently viewing शिराळे जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व स्वच्छता गृह कामाचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

शिराळे जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व स्वच्छता गृह कामाचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

शाळा दुरुस्ती कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध : ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व सदस्या प्रियांका पाटील यांच्या प्रयत्नांना यश ग्रामसेवक प्रशांत जाधव यांचेही मोलाचे सहकार्य

वैभववाडी-

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथील शिराळे गावच्या जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती व नवीन स्वच्छतागृह बांधणे कामाचे भूमिपूजन गावचे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील शाळेचे मुख्याध्यापक विनोद करपे, भाजप उपाध्यक्ष विजय पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले. शाळा दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत व स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत या दोन्ही कामांना निधी उपलब्ध झाला असून या कामासाठी प्रभाग सदस्य नवलराज काळे व प्रियांका पाटील यांनी पाठपुरावा केला होता. जनतेतून विद्यार्थी पालक शिक्षक वर्गातून शाळा दुरुस्तीबाबत वारंवार विचारणा होत होती मागणी करत होते या मागणीचा गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने आदर करत. मागील वर्षापासून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी या कामांसाठी विशेष लक्ष देत काम पूर्तता करण्याकरिता प्रयत्न केले होते. या कामासाठी ग्रामसेवक प्रशांत जाधव अतिशय मोलाचे सहकार्य देत काम मंजुरीसाठी सहकार्य केले. भूमिपूजन वेळी बोलत असताना ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी प्रभागात होणाऱ्या कामांचा आढावा देत जनतेने दिलेली जबाबदारी आम्ही कधीही विसरणार नाही येणाऱ्या काळात गावच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून गावात विविध उपक्रम राबवण्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध राहू असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले. इथून पुढे कोणतेही काम करायचे असेल तर आता कोणतीही चिंता नाही याआधी आमचे हात तोकडे पडायचे परंतु आज रोजी आमचे हात लांबही झालेत आणि आणि मजबूत ही झाले.आमचे हात बळकट करणाऱ्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य व जनतेचे काळे यांनी आभार मानले. यापुढे अंगणवाडीचे काम,देवळाच्या संरक्षण भिंतीचे काम व वाढीवस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाची भूमिपूजन येणाऱ्या आठवड्याभरात कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देखील नवलराज काळे यांनी यावेळी दिली. या सर्व कामांमध्ये भाजप खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे मोलाचे सहकार्य आम्हास लाभत आहे त्याबाबत प्रकाश पाटील यांचे देखील आभार नवलराज काळे यांनी मानले. या उद्घाटन प्रसंगी सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच अनंत जंगम, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, भारतीय जनता पार्टीचे बुथ अध्यक्ष श्री विजय बाबाजी पाटील, माजी उपसरपंच सखाराम पाटील, चंद्रकांत डेळेकर, भाजप महिला बुथ अध्यक्ष अमृता पाटील, ठेकेदार रमेश शेळके,शाळेचे मुख्याध्यापक विनोद करपे, शिक्षिका सौ. पाटील मॅडम, सौ केळकर मॅडम भाजप बूथ सचिव महेश डेळेकर, व्हाट्सअप ग्रुप प्रमुख प्रभाकर पाटील, अनंत पाटील, वासुदेव पाटील, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र पाटील,जयेंद्र बोडेकर, सौ शेळके, रामचंद्र बोडेकर, श्री धामणे श्री पारखे ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत पाणी कर्मचारी अशोक पाटील व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा