बांदा
कोरोना कालावधीत अर्धवट राहिलेल्या पाईपलाईन खोदाई कामामुळे मडुरा चवडीवाडी लगत असलेली रेडकरवाडी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
अधिकाऱ्यांचे भरपाई देण्याचे आश्वासन गेली चार वर्ष हवेत विरत असल्याचे पाहत भाजप सातार्डा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कंपनीला शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली.
कोरोनाच्या काळात अर्धवट असलेले पाईपलाईन खोदाई काम तिलारी पाटबंधारे विभागाचे ठेकेदार स्वस्तिक कंपनीने हाती घेतले होते.
परंतु सदर काम वेळेत पूर्ण न करता तसेच अर्धवट स्थितीत होते. भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी स्वस्तिक कंपनी सोबत आक्रमक भूमिका घेत शेतकरी व ठेकेदार यांच्यात मध्यस्थी केली अन शेतकऱ्याना योग्य तो मोबदला मिळवून दिला. स्वस्तिक कंपनीचे अधिकारी सागर गुरव यांनी मडुरा येथे येत झालेल्या नुकसान भरपाईचा धनादेश शेतकऱ्यांना सुपूर्द केला. यावेळी शेतकरी सुकाजी मोरजकर, नितीन रेडकर, प्रसाद मोरजकर, महेश मोरजकर, प्रकाश पंडित, प्रवीण परब, सुशांत मोरजकर, उषा मोरजकर, राजश्री मोरजकर, स्नेहा मोरजकर आदी उपस्थित होते.