सावंतवाडी
आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे केले जाणार आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.तर तेरेखोल खाडीपात्रात होणारी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी उपायोजना आखण्यात येणार आहे तशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जमिनीची धूप रोखण्यासाठी संरक्षण भिती उभारण्यात येणार असल्याचेही मंत्री केसरकर म्हणाले.
मंत्री केसरकर यांनी आज आरोंदा तळवणे सातार्डा किनळे रेडी येथील सरपंचांना सोबत घेऊन खाडी किनारपट्टी भागाची पाहणी केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा येथे पर्यटनाला अतिशय सुंदर जागा आहे आमदार होण्याच्या आधीपासून आपण या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहे कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला होता मात्र काही अडचणीमुळे पर्यटन होऊ शकले नाही. आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन होण्यासाठी माझे प्रयत्न राहतील त्यासाठी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येणार आहे या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच यासाठी पाऊले उचलले जाणार असून आवश्यक सुचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
आरोंदा ते सातार्डा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्यामुळेच किनारपट्टी भागातील जमिनीची धूप होऊन माड बागायती उद्वस्त होत आहेत ही वाळू उपसा रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना आखण्यात येणार आहेत. शिवाय किनार्यावर संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विकास होतांना स्थानिकांचे तसेच अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असते त्यामुळे सरपंचांना घेऊन या भागाची आपण पाहणी केली. त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की ज्या पध्दतीचे पर्यटन जिल्ह्यात आणू इच्छीतो ते पर्यटन येथे आणून जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर पोहचवू असे दीपक केसरकर म्हणाले.