सिंधुदुर्गनगरी
कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेचा मोबदला देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने प्रकल्पग्रस्त (लाभार्थी) वैशाली वासुदेव शिंदे व केतन वासुदेव शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले.
कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी वैशाली शिंदे व केतन शिंदे यांची जमीन संपादित करण्यात आली आहे.या संपादित केलेला स्थावर मालमत्तेचा मोबदला मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तरी अद्याप मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही. शासनाकडून ही हक्काची रक्कम देण्यासाठी वेळ काढू धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे. असे वैशाली शिंदे व केतन शिंदे यांचे म्हणणे असून याबाबत प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले तर याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास १ मे ला पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.