You are currently viewing नूतन प्रांताधिकारी ॲड. कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली सदिच्छा भेट

नूतन प्रांताधिकारी ॲड. कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली सदिच्छा भेट

प्रशासकीय कारकिर्दीला दिल्या शुभेच्छा

कणकवली :

कणकवली चे नूतन प्रांताधिकारी ॲड. जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज सदिच्छा भेट घेतली. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात ऍड. कातकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी तहसीलदार रमेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर, सागर वारंग, सखाराम हुंबे, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.

नूतन प्रांताधिकारी ऍड. जगदीश कातकर यांनी याआधी कणकवली नायब तहसीलदार, कणकवली तहसीलदार पदी उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे येथील जनतेच्या अडचणींची कल्पना ऍड कातकर याना आहे. साहजिकच आपल्या पूर्वानुभवाचा फायदा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल आणि प्रांताधिकारी कार्यालयाचा लोकाभिमुख प्रशासकीय कारभार अनुभवायला मिळेल अशा भावना पिळणकर यांनी व्यक्त केल्या. पुढील प्रशासकीय कारकिर्दीला प्रांताधिकारी ऍड कातकर याना शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकारी ऍड कातकर यांनी सर्वसामान्य जनता हाच केंद्रबिंदू ठेवून प्रशासकीय कारभार करत लोकसेवक म्हणून जनतेला न्याय दिला जाईल. प्रांताधिकारी दालन सर्वसामान्य जनतेला नेहमीच उघडे असेल असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा