– खासदार विनायक राऊत
कणकवली
ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रम राबवून संप्रदायाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करत आहेत.त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य संप्रदायाच्या माध्यमातून ते करीत आहेत.असे गौरवोद्गार खा.विनायक राऊत यांनी काढले.
ते शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उद्योजक शंकर पार्सेकर, सचिन सावंत, प्रभाकर करंबेळकर,अनंत गोळवणकर,उपसरपंच प्रविण तांबे, भिकाजी सावंत, अमोल सावंत, प्रशांत कुडतरकर, सुनिल कुडतरकर रुपेश सावंत, सुर्यकांत सावंत आदी उपस्थित होते
यावेळी खा.विनायक राऊत म्हणाले की,आज सुशिक्षित आणि सुसंस्कृत निर्व्यसनी पिढी घडविण्याचे काम ह.भ.प.गवंडळकर महाराज संप्रदायाच्या माध्यमातून करीत आहेत.सर्वच समाजासाठी ते प्रेरणादायी आहे.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रमाचे सातत्याने गेली आठ वर्षे आयोजन करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
महाराष्ट्रातील संतकवी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत रचलेली ज्ञानेश्वरी ही श्रीमद भागवत गीतेवर लिहिलेला पहिला अर्थपूर्ण ग्रंथ आहे,
ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या संकल्पनेतून शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होत आहे.
आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीला वेगळे स्थान आहे आपण जीवन जगत असताना भगवंताची भक्ती केली पाहिजे.आपल्या धर्मामध्ये अनेक ग्रंथ आहेत. रामायण आहे, दासबोध आहे अनेक अनेक ग्रंथ आहेत. सर्व ग्रंथांमध्ये फक्त ज्ञानेश्वरी अशी आहे,ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात गीता आहे.भगवंत आणि मानव यांच्यामध्ये झालेला तो संवाद आहे. आणि तो संवाद ज्ञानेश्वरीच्या रूपाने पाकृत मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी तो आपल्यामध्ये आणला.
म्हणूनच या ज्ञानेश्वरी चे पारायण करत असताना संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे, भगवंत एकमेव कृपाळू आहे.भगवतांनी जो भक्ती मार्ग दाखविला त्या मार्गाने जात भगवंताचे नामस्मरण करावे आणि भगवंताची भक्ती करावी.असेही खासदार राऊत यांनी सांगितले.सोमवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाला श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर शिरवल येथे का.राऊत यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वारकरी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो – शिरवल – खासदार विनायक राऊत श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दर्शन घेताना यावेळी सोबत सुशांत नाईक,सचिन सावंत, प्रभाकर करंबेळकर, प्रशांत कुडतरकर आदी