You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवण्यासाठी केलेला ‘बीज बॉल’चा उपक्रम:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवण्यासाठी केलेला ‘बीज बॉल’चा उपक्रम:

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवण्यासाठी ‘बीज बॉल’ बनवून निसर्गाच्या दिशेने पाहिले पाऊल पुढे घातले. स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा ‘बीज बॉल मेकिंग’ म्हणजेच ‘बियांचा गोल आकाराच्या गोळा तयार करणे’ हा अतिशय सुंदर असा उपक्रम शाळेमध्ये घेतला. ज्यामध्ये पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मुलांना विविध प्रकारच्या त्यांनी स्वतः खाल्लेल्या फळांच्या बिया गोळा करण्याचे कार्य दिले गेले. कोकणामध्ये या वातावरणात जी फळझाडे होतात, अशा फळ बियांचा वापर मुख्यतः केला गेला. विद्यार्थ्यांनी अशा बिया शाळेत आणून जमा केल्या. माती, पाणी आणि कंपोस्ट म्हणजे शेणखत यांचा वापर एकत्र करून त्यामध्ये बिया टाकून त्यापासून बीज बॉल तयार केले. ज्यावेळी पाऊस येईल त्यावेळी आपण जंगलामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये हे बीज बॉल टाकल्यास त्या अगदी अतिशय सहजरीत्या उगवून वरती येतील. आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले गेले. शाळेतील सर्व मुलांनी या उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बागेसाठी गोंड्याच्या फुलांच्या ज्या बिया गोळा केल्या होत्या, त्यापासून त्यांनी बीज बॉल बनवले. इयत्ता दुसरीच्या मुलांनी पपई, सीताफळ आणि रामफळाच्या बियांपासून बीज बॉल बनवले. तर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी जांभूळ आणि चिकूच्या फळबियांपासून बीज बॉल बनवले. तसेच ईयत्ता चौथीच्या मुलांनी जांभूळ ,पपई व पेरूच्या बियांचा वापर करून बीजबॉल बनवले. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीच्या मुलांनी फणस, आंबा, काजू ,आवळा ,चिंच तसेच लिंबू या फळबियांचा वापर करून लहान- मोठ्या आकाराचे बीज बॉल बनवले. हे बीज बॉल विद्यार्थी येत्या जून मध्ये पर्यावरण दिनाच्या दिवशी जंगलामध्ये पेरून त्यापासून जंगल निर्मितीला मदत करण्याचा प्रयत्न करून निसर्गाचा समतोल राखण्याकरता पुढे पाऊल घालणार आहे . बिया गोळा करण्यापासून त्यानंतर बीज बॉलची निर्मिती करेपर्यंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाला शाळेच्या कलाशिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे व सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा