रोटरी क्लब ऑफ डायमंडसचा उपक्रम
ऋतू हिरवाच्या शब्दसुरात रंगलेली एक संध्याकाळ
कल्याण : ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांची ऋतू हिरवा ही सांगीतिक मैफल कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडली. हेमलकसा येथील पद्मश्री डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी निधी संकलन म्हणून रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सांगीतिक संध्येची सुरुवात जेष्ठ गायक श्रीधर फडके , क्लब प्रेसिडेंट रो. राजेश चासकर , प्रकल्प प्रमुख रो. अरविंद शिंदे , सेक्रेटरी रो अभिलाषा पवार , ट्रेझरर रो पल्लवी चौधरी आणि अक्षरमंच प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ योगेश जोशी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ” ने मजसी ने परत मातृभूमीला ” या गाण्याने श्रीधर फडके यांनी ऋतू हिरवा या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्या कोवळ्या फुलांचा , फिटे अंधाराचे जाळे , ओंकार स्वरुपा, जय शारदे वागिश्वरी, ऋतू हिरवा ऋतू बरवा , मी राधिका मी प्रेमिका अशा एकाहून एक सुंदर रचना श्रीधर फडके व त्यांचे सोबत असलेल्या सहगायिका शिल्पा पुणतांबेकर, शेफाली साकुरीकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गाणे सादर करण्यापूर्वी श्रीधर फडके आणि निवेदिका सुकन्या जोशी यांनी गाण्याची जन्मकथा व त्या गाण्याविषयक आठवणी सांगून सांगीतिक संध्येमध्ये रंग भरला. तुषार आगरे ( तबला) , व्यंकटेश कुलकर्णी ( तालवाद्य) , ओमकार गोखले ( की बोर्ड) , वरद कठापूरकर ( बासरी) यांनी वादन साथ दिली.
कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक म्हणून अक्षरमंच सामजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी काम पाहिले . उपक्रम यशस्वी होण्यासाठी फर्स्ट लेडी गायत्री चासकर , सचिन पीतांबरे , प्रबोध तनखीवाले, अतुल धुमाळ , सचिन चौबे , डॉ घोणे,शरद चासकर , एम जे मुशिर , बाळासाहेब एरंडे , संजय पैठणकर , सोमनाथ चौधरी , डॉ स्मिता तनखीवाले , निशिगंधा वनसूत्रे , क्षमा कुलकर्णी, संगीता अ. शिंदे , पल्लवी पीतांबरे फोटोग्राफर आदी रोटरी सदस्य तसेच रोट्रॅक्ट क्लबचे अभिजित बाऊसकर, ओंकार धुमाळ ,सतीश गुप्ता , प्रणित कासरे , तेजस्विनी बाऊसकर, देव नागरवाला, आनंद काजरोले , सानिया पाटील , प्रणाली पाटील यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला डीजीएनडी हर्ष मकोल , सीडीएमटी मेम्बर ललित मानिक , प्रमोद मौलवी तसेंच एसीपी उमेश माने पाटील सर यांची विशेष उपस्थिती होती . या कार्यक्रमाला कल्याणकरांनी भरभरून प्रतिसाद दिला..