*दत्तोपासक घाणेकर स्मृतिमंचतर्फे 15 नामवंतांना 2023 चे राष्ट्रगौरव पुरस्कार वितरीत*
वसुधा नाईक (प्रतिनिधी)
पुणे :
22 एप्रिल 2023 : दत्तोपासक स्व.एकनाथ घाणेकर यांची 125वी जयंती आणि दत्तोपासक स्व.ताई घाणेकर यांचा 25 वा स्मृतिदिन यानिमित्ताने दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतिमंचतर्फे संस्थापक, अध्यक्ष आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दत्तोपासक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते समाजातील विविध क्षेत्रातील 15 यशस्वितांना राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ” मनापासून केलेल्या ईश्वर भक्तीस शुध्द आचरणात
जोड लाभल्यास ख-या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. मातृपितृ ऋणांबरोबरच प्रत्येकाने समाजऋणांचेही भान ठेवले पाहिजे कारण समाजामधे मातृपितृतुल्य प्रेमाची क्षमता असते ” असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी या सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात केले.
भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, मधुरंग संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदा
नाईक, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष कवयित्री प्रिया दामले, स्मृतिमंचच्या कार्याध्यक्ष शशिकला घाणेकर सोवनी, उपाध्यक्ष मेघना घाणेकर आदि मान्यवर मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती. डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 419 व्या विश्वविक्रमी अनितकालिकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ज्योतिर्विद डाॅ.सुवर्णा सुत्रावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याच सोहळ्यात ऋचा घाणेकर थत्ते यांनी
दत्तगुरुंचे 24 गुरु या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले.उत्तरार्धात
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी दत्तोपासक स्व.एकनाथ घाणेकर आणि स्व.ताई घाणेकर या दांपत्याने ताथवडे गावी
दत्तसंप्रदायासाठी दिलेल्या प्रदीर्घकालिन त्यागपूर्ण योगदानाचा वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. तसेच जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ब्रम्हध्यान
विषयक डाॅ.घाणेकर यांनी उपस्थित
साधकांसाठी ब्रम्हध्यान शिबिरही घेतले. अविनाश थत्ते आणि आर्य थत्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शशिकला घाणेकर सोवनी, श्रीनिवास तेलंग, प्रिया दामले या मान्यवरांचीही याप्रसंगी भाषणे झाली. मेघना घाणेकर यांनी आभार मानले. पुरस्कारार्थींच्या वतीने वसुधा क्रिएशनच्या अध्यक्ष वसुधा नाईक, अभिनेते प्रदीप देवकर, ज्योतिर्विद श्यामल वाघ,पत्रकार आम्रपाली धेंडे,
ज्येष्ठ साहित्यिक सुवर्णा जाधव, सांजभेट संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप शुक्ल तसेच गायक विलास दातार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद मिसाळ, त्र्यंबक बोरीकर, रंगकर्मी सतीश इंदापूरकर, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या सचिव अजिता मुळीक, युवा सामाजिक कार्यकर्ते जयंत हिरे आणि सारिका सासवडे यांनाही स्मृतिमंच तर्फे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मुरकेवार , प्रकाश साठे
आणि आघाडीच्या युवा कवयित्री योगिता कोठेकर यांचाही याप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कुलकर्णी, प्रदीप शिंदे आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————