You are currently viewing पुस्तक आणि मी

पुस्तक आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललितलेख*

*पुस्तक आणि मी*

एक दिवस पुस्तकांचा म्हणून साजरा करण्यापेक्षा पुस्तकांना मित्र बनविले तर किती चांगले… नाही का…?
पुस्तक मित्र म्हणून नेहमीच उत्तम सल्ला आणि अमूल्य ज्ञान देतात…मग का न करावी त्यांच्याशी मैत्री…?
हाताचं बोट धरून आई वडिलांनी शिकवलं…गुरूंनी ज्ञानार्जन केलं तरी डोक्यात लख्ख प्रकाश टाकतात ती पुस्तकेच…!
*”वाचाल तर वाचाल”*
असा अमूल्य विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिला आहे. ज्ञान आणि वाचन यांचे अगदी घनिष्ठ नाते आहे. ज्ञान मिळवायचे असेल तर वाचनाला पर्याय नाही आणि वाचन केलं तरच ज्ञान मिळणार हे समीकरणच आहे. त्यामुळे ज्ञान आणि वाचन एकमेकांवर अवलंबून आहेत. वाचन करणे म्हणजे केवळ पुस्तकांचं वाचन…कारण ती स्पर्शज्ञान, नेत्रज्ञान अन् गंधज्ञान सुद्धा देतात. पुस्तकांचा विशिष्ट गंध आपणास पुस्तकाकडे आकर्षित करतो, वाचनाचे वेड लावतो.
पुस्तकं वाचण्याचे ज्ञान वाढते, शब्द नजरेसमोर रेंगाळतात, मनात बसतात अन् हृदयात कायमचे घर करतात. काही क्षण मोबाईलवर आलेले संदेश वरचेवर वाचून ज्ञान वाढत नाही तर त्याकडे बहुतांश वेळी दुर्लक्षच होतो; पण पुस्तकांचे तसे नसते. पुस्तकांची आवड असणारे शब्दांशब्द मन लावून वाचतात, विचार आत्मसात करतात म्हणून पुस्तकांचे वाचन हेच खरे वाचन…!
अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनालयातील पुस्तके वाचकांच्या प्रतीक्षेत कपाटात धूळ खात पडलीत…जीर्ण झालीत… छिन्नविछिन्न होत…आपला देह ठेवत आहेत. *”लिहा, वाचा, शिका, साक्षर व्हा…”* असे आज नव्या पिढीला सांगावं लागतं आहे हे दुर्दैवच…! एकीकडे पुस्तकांशी असलेली मैत्री तोडून माणसांनी संगत मोबाईलची केली…जणू घनिष्ठ मैत्रीच बनविली…हक्काचे नाते जोडले; अन् वाचन संस्कृतीशी फारकत घेतली. त्यामुळे ज्ञानप्राप्ती न होता सोशल मीडियावर मिळणाऱ्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर लोक स्वतःला पंडित समजू लागले. गूगल वर काहीही शोधलं तरी भेटतं या भाबड्या गैरसमजामुळे लोकांनी अंधपणे गूगल म्हणजेच सर्वज्ञानी अशी संकल्पना मनात बसविली. शाळा महाविद्यालयातील मुले देखील वाचनापासून दूर गेली. प्रश्नांची उत्तरे देखील एका वाक्यात किंवा पर्याय शोधून लिहू लागली. पुस्तकातील धडे वाचणे हे शाळांनी देखील बंदच केले आणि त्यामुळे मुलांना वाचनाची आवड कमी झाली. पर्यायाने अतिरिक्त वाचन थांबलं आणि सुसंस्कृत, सुशिक्षित पिढीची निर्मिती होण्यापेक्षा अशिशित, अर्धशिक्षित लोक समाजात वावरू लागले. शैक्षणिक युनिव्हर्सिटीच्या पुढे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी काम करू लागली…जे व्हॉट्सॲप वर येईल तेच सत्य मानून लोक अर्धशिक्षित बनले.
“प्रत्येकाला एक छंद असावा” असं म्हटलं जातं. कारण चांगला छंद प्रकृती आणि आरोग्यासाठी लाभदायक असतो. पुस्तक वाचनासारखा छंद जीवनात सद्विचार रुजवतो आणि सद्गुण अंगी भिनवतो. एकदा का शब्दांशी खेळण्याची सवय लागली की इतर गोष्टींचा विसर पडतो अन् शब्दांचा लळा लागतो, ओढ वाटते. मी सर्वप्रथम वाचली ती *”मृत्युंजय”* लेखक श्री.शिवाजी सावंत यांची कादंबरी…! कोणत्याही मराठी कादंबरीला लाभली नसेल एवढी अमाप लोकप्रियता मृत्युंजयला लाभली. महारथी कर्णाच्या दानशुरत्वाला तोडच नाही हे मृत्युंजय मधून आपल्या अनुभवास येईल. एकदा वाचायला सुरू केली की, पुढे पुढे वाचत जाण्याची उत्सुकता शिगेला पोचविणारी, अशी मृत्युंजय कादंबरी आहे. शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय मधून कर्णाची अमर गाथा मांडलेली असून महाभारतातील पात्र महापराक्रमी, महारथी, दानशूर कर्णाला ही समर्पित आहे. “मरणानंतरही जिवंत असणे म्हणजे मृत्युंजय…”. महाभारतात खलनायक म्हणून परिचित असलेला कर्ण हा महाभारतातील खरा नायक कसा होता ते या कादंबरीतून आपल्या समजून येईल. दानशूरपणा, संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जपावी, शक्तीची घमेंड उतरविणारी अशी ही ऐतिहासिक कादंबरी आहे. मी आजपर्यंत वाचलेली अन् मला भावलेली सर्वोत्तम कादंबरी.
लेखिका शोभा राऊत लिखित *”अबोल प्रीत बहरली”* प्रितीचे पुष्प मनात फुलवणारी ही प्रेममय भावना अलगद जागृत करणारी कादंबरी. महाविद्यालयीन जीवन म्हणजे युवक युवतीच्या भावविश्वाची एकेक पाकळी फुलत उमलणारे गुलाबपुष्प…! रोजचे जीवन, सहलीतील गमतीजमती, मजेशीर किस्से, आणि परीक्षा असे महाविद्यालयीन जीवन लेखिकेने या कादंबरीतून शब्द कळ्यांना गुंफून पुष्पहारासम उभे केले आहे… युवापिढीच्या हृदयाच्याजवळ जाणारी, आकर्षून घेणारी अशी ही कादंबरी आहे.
कुमुदिनी रांगणेकर, वि. स.खांडेकर यांच्याही अनेक अफलातून कादंबरी वाचण्यासारखा आहेत. कविवर्य केशवसुतांच्या कविता “संध्याकाळ”, “तुतारी”, “स्फूर्ती” तर मनावर राज्य करतात… पु. ल., अत्रे अशा अनेक दिग्गजांनी पुस्तके वाचणे म्हणजे आपले भाग्यच…! आपल्याही नशिबी ते भाग्य लाभावे ही प्रत्येकाची इच्छा असावी.
पुस्तकांचा नाद
लागो मज वेडा
अक्षर ओढीची
मना भुरळ पाडा
पुस्तकांचा नाद लागेल तेव्हा नक्कीच अक्षरांची ओढ वाटेल अन् शब्दांची मनावर भुरळ पडून प्रत्येक वेळी पुस्तक हातात दिसेल.
एका चित्रात मांजर पुस्तकांची पाने चाळताना की फडफडणारी पाने थांबवताना दिसते… तेव्हा मात्र मन पुन्हा एकदा तिथेच रेंगाळतं… जिथे मुलांनी, माणसांनी वाचक म्हणून पुस्तकाकडे दुर्लक्ष केला तिथे अक्षर ओळख नसलेलं मांजर नक्की काय वाचतेय…? तिला त्यात काय समजतं..? असे प्रश्न नक्कीच मनाशी घर करतात. परंतु….
मला वाटतं…मांजर वाचत नसेल, चित्रही पाहत नसेल तर वाचकांनी आपल्याकडे पहावे म्हणून वाऱ्याने फडफड करणारी पाने शांत करून मानव जातीला फडफड करणाऱ्या पुस्तकाकडे पहा…अन् पुन्हा एकदा वाचनाकडे वळा… कारण “वाचाल तरच वाचाल” असा डॉ. बाबासाहेबांचा सल्ला मानायला सांगत असावे असेच वाटते…!

*©दीपक पटेकर [दीपी]*
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

*संवाद मीडिया*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा