मालवण :
दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत आणि वेर्ले गावचा सुपुत्र श्रीकृष्ण राजन लिंगवत या दोघांची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा महाबळेश्वर पाचगणी येथे पार पडली.
वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोच उपस्थित होते. या शिबिरात ऋतिक सावंत आणि श्रीकृष्ण लिंगवत या दोघांनीही चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे ऋतिक सावंत याची ५८ किलो वजन गटातून तर श्रीकृष्ण लिंग व त्याची ५५ किलो वजन गटातून या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या जुलै महिन्याच्या पंजाबमध्ये ही राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे.