You are currently viewing “कविता मानववादी असते!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

“कविता मानववादी असते!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

शब्दधन काव्यमंच तर्फे काव्य पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी

“कविता मानववादी असते परंतु कवितेला कोणताही धर्म नसतो. भौगोलिकतेच्या सर्व सीमा ओलांडून रसिकांच्या काळजाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य कवितेत असते!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री ललिता श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते श्रीकांत चौगुले (शब्दधन काव्यप्रतिभा), हेमंत जोशी आणि सुभाष चटणे (स्वर्गीय अरविंद भुजबळ स्मृती); तसेच ज्योती शिंदे (रोहा,रायगड) स्वप्ना जगदळे (नागपूर) दत्तात्रय खंडाळे (पुणे) शामला पंडित-दीक्षित, मयूरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर यांना रमेश पाचंगे यांच्या सुरेल चौघडावादनाच्या पार्श्वभूमीवर शब्दधन छावा काव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्वागताध्यक्ष नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, डॉ. राजेंद्र कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस आणि ललिता सबनीस या
साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध दाम्पत्याला विठ्ठल-रखुमाईची उपमा देऊन त्यांचा फुलांचा हार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…” या भक्तिगीताचे गायन केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंचाने तेवीस वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले; अन्य कवींनी कवितांचे सादरीकरण केले.

याप्रसंगी सभागृहात
पुरुषोत्तम सदाफुले, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, बशीर मुजावर, प्रभाकर वाघोले, बाजीराव सातपुते, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, प्रदीप तळेकर, रामचंद्र प्रधान, सुहास घुमरे, धनश्री चौगुले, कैलास भैरट, डॉ. क्षितिजा गांधी, सविता इंगळे, नीलेश शेंबेकर, आनंद मुळूक, अनिल नाटेकर, अमिता देशपांडे, शिवाजीराव शिर्के, राजू जाधव, रघुनाथ पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या संयोजनात एकनाथ उगले, आत्माराम हारे, फुलवती जगताप, शामराव सरकाळे, वर्षा बालगोपाल, मुरलीधर दळवी, तानाजी एकोंडे यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा