*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुरेश भट (एक अवलिया)*
काय हा माणूस होता पुन्हा होणार नाही
धन्य ती माऊली जन्मदात्री त्याची आई…
हिरा जन्मला पोटी चिरंजीव नभ झाले
आणि विश्व शाश्वताच्या प्रकाशी न्हाले…
दिव्यरत्न काव्यप्रांती दुर्मिळ योग आहे
एकेका ओळी वरती मुद्रा कोरली राहे…
अमृताचे घट त्याचे प्राशूनी ना शांत हो
हा अजब अवलिया विश्व व्यापून आहे ….
चंद्र सूर्य जोवरी तळपेल विश्वात या
हृदयात त्याच्या साठवून घ्याव्या वह्या…
जीव ओवाळून टाका या अवलियावरी
पुन्हा न होणे भाषा अशी सदा नोवरी..
हा सुरांचा ईश आहे सम्राट जगत्व्यापी
ओसांडून वाहे अजुनी सुगंधित वापी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २० एप्रिल २०२३
वेळ : सकाळी ९/२४