मालवण
दांडी येथील तृषाली तारी यांच्या घरावरून गेलेली ११ केव्हीची महावितरणची वीज वाहिनी अखेर शुक्रवारी स्थलांतरित करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागल्याने तारी कुटुंबियांनी आभार मानले आहेत. दांडी येथील तृषाली तारी यांच्या घरावरून महावितरणची ११ केव्हीची वीज वाहिनी गेली होती. त्यामुळे तारी कुटुंबियांना धोका निर्माण झाला होता. यासाठी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले असता, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, पंकज सादये, सन्मेष परब, तपस्वी मयेकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. त्यानुसार आमदार नाईक यांनी महावितरणच्या . कणकवली कार्यकारी अभियत्यांना पत्र पाठवून याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना दिली. त्यानुसार आज ही वाहिनी अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली. यावेळी सन्मेष परब, तारी, अरुण दूधवडकर, प्रफुल्ल दूधवडकर, शाखाप्रमुख नारायण रोगे, वरद धुरी आदी उपस्थित होते.