ओसरगाव तलावाचे २३ एप्रिल ला भूमिपूजन; पर्यटन विकासाला चालना
कणकवली :
ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी मागे उपोषण छेडले होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी पिचिंगच्या कामासाठी ७० लाखाचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्या कामाचे २३ तारखेला सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने स्थानिक आम. श्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी तलावाच्या विकासासाठी वेळीच उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे.
त्यानंतर पुढील टप्प्यात पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून स्थानिक आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून साडेतीन कोटीचा भरघोस नीधी प्राप्त झाला आहे. त्या कामाची प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यावर त्याचेही धुमधडाक्यात भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ओसरगाव ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त करून आम. राणे यांचे जाहीर आभार मानले.