You are currently viewing कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा

कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा

अमरावती’ येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश…

तळेरे -प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचा इ.७ वी मधील कु. अथर्व आशिष जोशी याने १४ वर्षाखालील मुलांच्या 25 कि.ग्रॅ. वजन गटात कोल्हापूर विभागाच्यावतीने खेळताना त्याने राज्यस्तरावर कास्यपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
कु.अथर्व जोशी हा कासार्डे माध्यमिक विद्यालयात मोफत सुरू असलेल्या ‘ज्यूदो कराटे क्लासचा विद्यार्थी असून,आत्तापर्यंत त्यांनी विविधस्तरावर विजेते पद पटकावले आहे.
या यशस्वी खेळाडूला कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड, मुख्य प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, प्रशिक्षक सोनू जाधव यांच्यासह पालकांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत खेळाडूचे अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले , सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांच्यासह महाराष्ट्र राज्य ज्युदोअसोसिएशनचे
अध्यक्ष, सचिव, खजिनदार, टेक्निकल समितीचे सचिव इतर सर्व पदाधिकारी
कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी,स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
ज्युदो पट्टू अथर्व जोशीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

१)अथर्व जोशी..

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − sixteen =