सावंतवाडी
दारू, मटका, जुगार आदी अवैध धंद्यामुळे तरुण पिढी वाम मार्गाला लागली असल्याने हे काळे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, या मागणी साठी अँटी करप्शन फाउंडेशन च्या वतीने उप विभागीय पोलीस उप अधीक्षक रोहिणी सोळंखे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान हे काळे धंदे बंद पाडण्यासाठी जनतेने देखील पुढे येणे गरजेचे आहे. पोलीस आणि सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन डी वाय एस पी रोहिणी साळुंखे यांनी यावेळी केले.
तसेच अवैध धंद्यावर आळा घातला जाईल असे अभिवचन देखील त्यांनी फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी साळुंखे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी अँटी करप्शन फाउंडेशन स्टेट व्हाईस प्रेसिडेंट गोवा नयनेश गावडे, तालुका प्रेस सेक्रेटरी शैलेश मयेकर, सावंतवाडी तालुका प्रेसिडेंट एकनाथ चव्हाण, तालुका व्हाईस प्रेसिडेंट संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते