वेंगुर्ला
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१/२२ अंतर्गत परुळे बाजार ग्रामपंचायतीचे समितीमार्फत मुल्यमापन करण्यात आले.
सन २०२०/२१ मध्ये ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव‘ योजनेंतर्गत झालेल्या कामकाजाचे मुल्यमापन तसेच दस्तऐवज पडताळणी करण्यात आली.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विशाल तनपुरे, विस्तार अधिकारी श्री. शिंगाडे यांनी पाहणी केली.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रा.पं.सदस्य प्रदिप प्रभू, सुनाद राऊळ, पुनम परुळेकर, तन्वी दुधवडकर, नमिता परुळेकर प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, ग्रामसेवक शरद शिंदे यांसह अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, बचत गट प्रतिनीधी, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुकास्तरावर परुळे बाजार ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक आल्याने तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. तालुका स्मार्ट ग्राम म्हणुन निवड झाल्याने दहा लाख रुपये बक्षीसासाठी निवड झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा समितीकडुन मुल्यमापन करण्यात आले. एकंदरीत विविध अभियानात बक्षिसाचे सातत्य राखणा-या परुळे बाजार ग्रा.पं. या अभियानातही बक्षीस मिळणा-यासाठी सज्ज झाली आहे.