You are currently viewing मालवण तालुका काँग्रेस तर्फे शहरातील गटारांची तात्काळ साफसफाई करणे संदर्भात नगरपालिकेला निवेदन सादर

मालवण तालुका काँग्रेस तर्फे शहरातील गटारांची तात्काळ साफसफाई करणे संदर्भात नगरपालिकेला निवेदन सादर

मालवण

पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला असताना मालवण शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची अद्यापही साफसफाई झालेली नाही. त्यामुळे शहरातील गटारांची तात्काळ साफसफाई करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुकातर्फे आज मालवण नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मालवण शहरातील गटार साफसफाई बाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसतर्फे नगरपालिका कर्मचारी महेश परब यांच्याकडे निवेदन सदर केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार ताजर, युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, पल्लवी तारी- खानोलकर, श्रेयस माणगांवकर, पराग माणगावकर, योगेश्वर कुर्ले आदि उपस्थित होते.

पावसाळा येण्यास काही दिवस राहिले असून मालवण शहरामधील पाणी वाहून जाणारी गटारे अद्यापही साफ झाली नाहीत. गेल्यावर्षी लाखो रुपये खर्ची करून देखील अनेक गटारे अर्धवट साफ केली गेली. यामुळे पाणी गटारातून न वाहता रस्त्यावर साचल्याने दिसून आले. गटारां मधील माती व गाळ आजही तसाच असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करत असताना काम मात्र अर्धवट राहतात, यावर आम्ही देखील स्वतः प्रशासना सोबत शहरात फिरून आपल्या सोबत पाहणी करण्यास तयार आहोत, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगत महिन्याभराने पावसाळा सुरु होणार असून त्वरित गटारे साफसफाई करून घ्यावी, अशी मागणी निवेदनातून केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा