सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे आयोजन..
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत या स्पर्धेमध्ये एकूण 23 तंत्रनिकेतन संस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये अंतिम निवड झालेल्या 15 संघाना सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक या नात्याने शासकीय तंत्रनिकेतन, मालवणचे सिव्हिल विभाग प्रमुख दीपक बडेकर, कृष्णाई कन्स्ट्रक्शनचे राजेश यादव, प्राचार्य गजानन भोसले व सिव्हिल विभाग प्रमुख प्रसाद सावंत, केशव मणेरीकर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.एस.जी.ताजी हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये विवेकानंद एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, चेंबूर यांनी प्रथम, आग्नेल पॉलिटेक्निक, वाशी यांनी द्वितीय तर शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी व यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक, सावंतवाडी यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
छाननी समिती सदस्य म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे वाय एस पवार, भोसले पॉलिटेक्निकचे पी.डी.नाईक व एमआयटीएमचे प्रणव सावंत यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हवाबी शेख यांनी केले.