सावंतवाडी
मागील आठ दिवस गुळदुवे नाणोस गावात रात्रीच्या वेळेस येथील ग्रामस्थांना गव्यांचा कळप आढळून आला आहे. मनसेचे लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी वनविभागाकडे केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले असून शेतीचही बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा तात्काळ पंचनामा व्हावा व गव्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी मनसेचे सावंतवाडी लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक यांच्याकडे केली असून तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. तातडीने दखल न घेतल्यास मनसे शिष्टमंडळ उपवनसंरक्षक सावंतवाडी येथे घेराव घालणार असल्याचा इशारा श्री मामलेकर यांनी दिला.