You are currently viewing २२ एप्रिल रोजी वालावल येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

२२ एप्रिल रोजी वालावल येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

कुडाळ / वालावल (उदय गोसावी) :

 

मैत्री फाउंडेशन वालावल व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन वालावल ग्रामपंचायत सभागृहात येथे २२ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एनजी ओप्लास्टी, प्रोस्टेट तपासणी, बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा, हाडाचे फ्रॅक्चर, कॅन्सर शस्त्रक्रिया, आर्थोस्कॉपी द्वारे गुडघ्याची लिगामेंट शस्त्रक्रिया या मोफत सेवा उपलब्ध होतील.

तरी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मैत्री फाऊंडेशन वालावल व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

टीप.१. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड धारकांना शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील.

२. शिबिरामध्ये ज्या पेशंटला ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंट ना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी राजा प्रभू,  संदेश मटकर, निलेश साळसकर, प्रीतम वालावलकर 9673564373, चंद्रकांत वालावलकर 7588889409, समीर चौधरी 9422947868, कुलदीप खानोलकर 9420095179 यांना संपर्क साधावा.

आपल्या आरोग्याविषयी असलेल्या समस्येचे निरसन या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करून घ्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा