*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजेच सन्माननीय सदस्य कवी गझलकार लेखक जयराम धोंगडे यांनी डॉ.नयनचंद्र सरस्वते यांच्या “देह झाला प्राजक्ताचा” कादंबरीचे केलेले समीक्षण*
*स्त्रीजन्माचा सजग आक्रोश : देह झाला प्राजक्ताचा!*
फेसबुकवर फेसबुक फ्रेंड झालो तेंव्हापासून डॉ.नयनचंद्र सरस्वते या नावाने मनावर खोल अशी वैचारिक भुरळ घातली म्हणा की गूढ गारुड म्हणा, त्यांचं लेखन चिंतन करायला भाग पाडत गेलं… आम्ही फ्रेंड झालो तेंव्हापासून त्यांना ‘माई’ म्हणून मी संबोधतो. माईंची ‘देह झाला प्राजक्ताचा’ कादंबरी हाती पडली आणि झपाटल्यागत वाचून कधी हातावेगळी केली, मला कळलंच नाही. पण जेव्हा वाचून हातावेगळी केली तेंव्हा स्त्री जन्माची आगळीवेगळी सगळी कहाणी अनेक कंगोऱ्यासह नव्याने कळली.
देह प्राजक्ताचाच का? मोगरा, जाई, चंपा, चमेली, गुलाबाचा का नाही? साधं सोप्प लिहितील त्या माई कसल्या? अभिजात लेखिका जिथं वास करते, तिथं तिची लेखणीची धार विचारांवर स्वार झालेली असते. या कादंबरीच्या शिर्षकातच गहन तर्कशास्त्र सामावले आहे. ‘पारिजातक’ यालाच काहीजण ‘प्राजक्त’ ही म्हणतात. एक कथा अशी आहे की, देखण्या सूर्यावर एक सुंदर, स्वप्नाळू राजकन्या मोहित होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु या राजकन्येवरून सुर्याचे मन काही कारणांमुळे उडते आणि तिला अव्हेरून तो दुस-या मुलीकडे निघून जातो. या अपमानाने निराश झालेली राजकन्या देहत्याग करते. तिच्या चितेच्या राखेतून रोपट्याच्या रूपाने ती पुन्हा जन्म घेते आणि तिचे वृक्षात रुपांतर होते. हा वृक्ष म्हणजे प्राजक्त! मात्र तिचा सूर्यावरचा राग गेलेला नाही त्यामुळे ती रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच आपल्या अश्रूंचा पुष्परूपी सडा जमिनीवर शिंपते. सुर्याप्रति असलेला आपला रोष व्यक्त करणारा, दिवसा कधीही न फुलणारा हा प्राजक्त ‘स्त्री’ जीवनाची व्यथा मांडण्यासाठी योजलेले रूपक मला व्यक्तिशः भावून गेलं. परंतु अनंत व्यथा असल्या तरी मनाला मारून स्त्री परिवाराच्या सुखासाठी जीवाचे रान करते. खस्ता खाते, सोसते पण कर्तव्यकसुर करीत नाही. प्राजक्तासारखा सुंगध ती कुटुंबाला देते.
माईंची या कादंबरीतील नायिका अपर्णा… आणि कादंबरीचे कथानक अध्यात्म, रूढी, परंपरा, चालीरीती आणि स्त्रीची यामधील भूमिका याला अधोरेखित करणारे विचारप्रवण असे आहे. अपर्णाचे भावविश्व… आपल्या अद्भुत प्रतिभाशक्तीने आणि अध्यात्माची कास असलेल्या माईंनी ताकतीने या कादंबरीत विषद केलं आहे. अपर्णा अमावास्येला शिवमंदिरात जाते आणि तिथेच तब्बल महिनाभर अडकून पडते… कायम बाप, माय आणि भाऊ शिवभक्तीत लिन-तल्लीन असणाऱ्या कुटुंबात जन्मलेली अपर्णा… महादेव महादेव करीत शिवार्पण झालेला बाप… त्यामुळे तिला महादेवाची प्रचंड चीड आणि राग आहे. आणि मग ती तिथे मंदिरात अडकून पडल्यावर… ती महादेवाला जाब विचारते… तिच्या राग, संताप, उद्वेग याची अद्भुत, अगम्य प्रश्नांची सरबत्ती आणि आपल्याच आकलनातून तिने मिळवलेली उत्तरे, समस्त स्त्री जन्माची, तिच्या व्यथा-वेदनांची चिरफाड करीत वाचकाला खिळवून ठेवतात… विचार करायला भाग पाडतात.
‘देह झाला प्राजक्ताचा’ची सारी कथा सांगून, कादंबरी वाचनाचा असलेला रसिकांचा उल्हास मी का घालवू? ही कादंबरी आपण मिळवून वाचलीच पाहिजे. गूढ तरी रंजक, अद्भुत तरीही अध्यात्मिक, स्त्रीने मांडलेला स्त्री जीवनाचा लेखाजोखा पुरुषांनाही विचार करायला नक्की भाग पाडेल.
माई डॉ. नयनचंद्र सरस्वस्ते यांनी अपर्णाच्या मुखी ठेवलेलं बावनकशी तत्वज्ञान खाली उद्धृत करतांना अतिशय नम्रतेने माईंना साष्टांग दंडवत करतो
“दोन्ही वेळेला जेवण मिळेल ही खात्री झाली तर लगेच अन्न फेकून द्यायला मन तयार होतं.” (मानवी उन्माद… !)
“आपण फार बुद्धीमान नाही… निदान त्यामुळे जगण्याची असोशी तरी टिकून आहे.” (असं विद्वत्तेचं तत्वज्ञान…!)
“बुद्धी मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण मन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं”. (पराकोटीची द्विधा अवस्था…!)
“श्रेष्ठत्व मान्य असतेच की… कोण नाकारतो? पण प्रत्येक वेळेस ते दाखवण्याचा अट्टाहास बालिश नाही का?” … (परिपक्वता म्हणजे अजून दुसरे काय…?)
“आतड्यात भूक उफाळत असली की काही-काही आठवत नाही धर्म, नियम, सामाजिक संकेत सोडा… माणूस असणं पण आठवत नाही…” (भूक धर्म जाणत नाही, पोटासाठी सर्व काही)
“रजस्वला बाईचा स्पर्श चालत नाही, पण तिनं काम केलं आणि त्यावर फक्त पाणी शिंपडलं की ते शुद्ध होतं बर का… बाईपेक्षा पाणी श्रेष्ठ… काय करता?” (धार्मिक थोतांड..!)
“नवऱ्याचा संसार करायचा, सासर म्हणजे माझं घर, नवरा म्हणजे विश्व, माहेर म्हणजे परक्याचं घर, बस्स असंच काहीतरी…” (प्राजक्तासारखं फुलायचं… गंधाळायचं… आणि आला बहार उधळायचा… पुन्हा फुलण्यासाठी!)
आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं आणि स्त्री जातीचं साधर्म्य आहे. स्त्री म्हणजे प्रकृती, या सृष्टीची निर्मिती करणारी, सृष्टीचे पालन करणारी आणि मनावर घेतले तर सृष्टीचा अंत करणारी ती आदिशक्ती… शिवाचे अर्धांग… पण तरीही दुर्लक्षित!
माईंच्या लेखनाचं समीक्षण करावं एवढा मी मोठा नाही. ना मी साहित्याचा विद्यार्थी आहे… परंतु वाचल्यावर मला आकलन झालेलं यथामती दोन शब्द लिहिण्याचं धाडस केलं… पण अगदी खरं सांगतो…
मला पामराला कुठे काय कळते?
स्त्रीदाक्षिण्याची पणती माझ्या हृदयात जळते!
माई, असंच साहित्यसृजन आपल्याकडून घडो, आमच्या ज्ञानात भर पडो… आणि आमचे वेडेवाकडे शब्द आपणास आवडो! या सदिच्छेसह… आपले सानंद आभार मानतो!
जयराम धोंगडे, नांदेड
(९४ २२ ५५ ३३ ६९)
संवाद मीडिया*
*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*
*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*
*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*
*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*
*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*
*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*
*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*
*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*
*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*
*जाहिरात लिंक*
———————————————-