You are currently viewing आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर तांत्रिक अडचणी पालकांनी भिती, संभ्रम बाळगू नये

आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर तांत्रिक अडचणी पालकांनी भिती, संभ्रम बाळगू नये

-प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकिया अंतर्गत ऑनलाईन सोडत बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली असून, ज्या बालकांची निवड यादी मध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्या बालकांच्या पालकांनी दिनांक 13 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत पंचायत समिती, महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याबाबत या पूर्वी निर्देश देण्यात आले होते.

सद्यास्थितीत आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याबाबत पालकांने कोणतीही भिती, संभ्रम बाळगू नये, तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) व्दारे निवड झाली आहे. अशा बालकांना शाळा प्रवेशाकरीता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा