You are currently viewing निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन

निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक रक्कमेची क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा २०२३ चा उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिमाखदार आयोजनाचे कौतुक केले. दरम्यान, कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. २० ते २२ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील नामांकित खेळाडूंचा समावेश असलेले १६ संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघाला रोख ३ लाख आणि निलेश राणे चषक दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्या संकल्पनेतून सहा वर्षे निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धा मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा गुरुवारी उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, गणेश कुशे, परशुराम पाटकर, भाजप महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, सौ. वैष्णवी मोंडकर, पूजा सरकारे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, अजिंक्य पाताडे, राजू वडवलकर, आपा लुडबे, जगदीश चव्हाण, अरविंद सावंत, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, जॉन नरोन्हा, बबन रेडकर, बंड्या पराडकर, नितीन मांजरेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Share

प्रतिक्रिया व्यक्त करा