वैभववाडी
वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि पोलीस नाईक मारुती साखरे यांना सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करून 20000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचार समोर आला आहे .
लाचलुचपत विभाग सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या पथकाने आज गुरुवार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैभववाडी पो.ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशी दरम्यान आलोसे १ व २ यांनी तक्रारदार यांनाच त्यांचे विरुध्द ३७६ चा गुन्हा दाखल करतो. असे सांगुन प्रथम 40000/- रुपयेची मागणी करुन तडजोडीअंती 30000/- रुपये लाचेची मागणी करुन लाचेचा पहीला हप्ता 20000/- रुपये घेवुन येण्यास सांगुन लाचेची रक्कम आज रोजी आलोसे क्र.१ यांनी आलोसे क्र.२ यांचेसमक्ष स्विकारल्यानंतर नमुद दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस नाईक मारुती साखरे यांच्या निवासस्थानाची चौकशी केली आहे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई होणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.