You are currently viewing वेर्ले येथे २३ रोजी डॉ. आंबेडकर जयंती होणार साजरी..

वेर्ले येथे २३ रोजी डॉ. आंबेडकर जयंती होणार साजरी..

सावंतवाडी

वेर्ले समतानगर येथे रविवार २३ रोजी रोजी सांगेली पंचक्रोशीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहण, पूजापाठ, त्यानंतर जय भीम रॅली व दुपारी ३ वाजता एकनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे.

उद्घाटक प्रभाकर जाधव (घावनळे) हे असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. संदीप निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा