You are currently viewing रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचा भावी खासदार एनडीएचाच : ना. रविंद्र चव्हाण

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचा भावी खासदार एनडीएचाच : ना. रविंद्र चव्हाण

केंद्राच्या व राज्याच्या योजना घराघरात पोहोचवा

सावंतवाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश आज महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे. अब्जावधी रुपयांचा निधी खर्च करून अनेक विकासकामं देशात व राज्यात होत आहेत. नरेंद्र मोदी यांची साथ अन् शिंदे-फडणवीस यांचा ध्यास यामुळेच हे शक्य आहे. सबका साथ, सबका विकास ही मोदींची संकल्पना आहे. देश सुजलाम, सुफलाम होण्यासाठी त्यांचा भर आहे. त्यामुळे त्याचं हे स्वप्न साकार करण्यासाठी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे ४०० पार खासदार हे मिशन आपल्याला साकार करायचं करायचे आहेत. यासाठी आगामी काळात आमचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एनडीएचाच खासदार निवडून येण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी केले.

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या पायरीवर ते नतमस्तक झाले. पंतप्रधान झालो तरी देशाचा जनसेवक म्हणून काम करेन ही नरेंद्र मोदी यांची भुमिका ते आजपर्यंत निभावत असून शेवटच्या व्यक्तिपर्यंत ही भुमिका पोहोचवत आहे. भाजप हा देशातील बलाढ्य पक्ष आहे. त्याग आणि समर्पणातून तयार झालेली ही पार्टी आहे. फळाची अपेक्षा न करता पक्षाचं काम करणारे असंख्य कार्यकर्ते भाजपात आहे. देशात व राज्यात नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे.

त्यांना ताकद देण्यासाठी भाजपची कमळ निशाणी छातीवर लावून घराघरात जाऊन देशातील व राज्यातील हे कार्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पारदर्शकता काय असते हे कोलगाव ग्रामपंचायतीन दाखवलं त्यांच करायचं तेवढं कौतुक थोड आहे. येणाऱ्या काळात डिजीटल माध्यमातून जाण आवश्यक आहे. भाजपच ‘कमळ’ २४ तास लावून फिराव व डबल इंजीनच्या सरकारचं काम तळागाळापर्यंत पोहोचवाव. सरकारन घेतलेला निर्णय, त्याचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आपण कमी पडतोय. शिंदे-फडणवीस सरकारनं केलेल्या कामाचं क्रेडिट सुद्धा आपण घेतलं पाहिजे. परिस्थिती बदलायची पण मानसिकता बदलायला हवी. शेवटच्या व्यक्तिपर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहीजेत. नेत्यांना फॉलो करत त्यांच्या भुमिका जनसामान्यांपर्यंत पोहचवा, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा