कणकवली
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून एका स्टोअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत कार्यरत असलेल्या मार्केटिंग कंपनीत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवार २० एप्रिल रोजी सकाळी ११ वा. आपल्या संपर्क कार्यालयात कागदपत्रांसह उपस्थित राहवे, असे आवाहन मनसे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
संबंधित कंपनीकडून ३० टक्के सूट देत विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टोअर्स सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे पुढे येत आहे. याविरोधात मनसेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात येणार आहे. यात फसवणूक झालेल्या सर्वांची मिळून एकत्रित तक्रार देण्यात येणार असून वेळ पडल्यास या मार्केटिंग कंपनीच्याविरोधात मोर्चाही काढण्यात येणार आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी २० रोजी उपस्थित राहवे, असे आवाहन उपरकर यांनी केले आहे.