You are currently viewing थोडंसं मनातलं

थोडंसं मनातलं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

*थोडंसं मनातलं*

*🙂बदल🙂*
आज सकाळपासूनच कशातच लक्ष लागत नव्हतं. उगाचच चिडचिड झाल्यासारखे होत होतं. लेकिनं याचं कारण विचारलं तर मी तिच्यावरही रागावले. मनात काहूर माजलं होतं. आपल्याला काय होतंय? कां होतंय? कोणामुळे चिडल्यासारखं होतंय? एक ना अनेक प्रश्नांची श्रुंखालाच तयार झाली.
शेवटी ‘प्राणायाम’ ह्या माझ्या मित्राची मी मदत घेतली. तेव्हा हळूहळू हे सगळे प्रश्न पुन्हा डोकावले. आणि यावेळी त्या एकेक प्रश्नांना मीच उत्तर देत होते. तेव्हा सगळ्या प्रश्नांच्या उत्तरातून मी असा निष्कर्ष काढला की, माझ्या रोजच्या मशीन प्रमाणे चालणाऱ्या रुटीन मुळे माझी ही अवस्था झाली आहे. घड्याळाच्या काट्यावर मी नाचते. कधी चुकून त्या तालावर नाचता नाही आलं तर दिवसाची पुढची सगळी काम कोलमडणार या भीतीने माझं मशीन रुपी शरीर मी अजून जोरात कामाला लावते.
प्राणायामातून एवढ्या नक्की झालं की माझ्यावर कामाचा ताण येतोय. पण त्या ताणामुळेही माझीच चिडचिड होते. म्हणजे तोही त्रास मलाच होतो. पण आता करायचं काय? माझी तगमग माझ्या डॉक्टर मुलीने आणि पतीने पाहिली. ते दोघेही म्हणाले,” तू स्वस्थ बसतच नाहीस. सतत काही ना काही काम शोधून काढतेस.” मलाही हे पटलं.
मग मात्र मला असं जाणवलं की हे फक्त माझ्याच बाबतीत नसेल. माझ्यासारख्या काम करणाऱ्या अर्थात व्यवसाय, नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाची मानसिकता अशीच होत असेल. हो,हो स्त्री ,पुरुष दोघांची. अहो पुरुषांनाही मन असतंच की! मग अशा मानसिकतेचा केवळ त्या व्यक्तीला त्रास होतो असं नाही; तर त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मित्र परिवाराला, किंवा ते जिथे काम करतात त्या लोकांनाही होतो. कामाचा व्याप खूप असेल आणि ती व्यक्ती जर कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी प्रमुख असेल तर मात्र इतरांची भंबेरी उडते. संपूर्ण वातावरण दूषित व्हायला लागतं. सगळ्यांनाच त्याचा तणाव येतो.
मग “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या वामनराव पै यांच्या उक्तीनुसार मी माझ्या मानसिकतेचा विचार केला. बऱ्याच दिवसानंतर मला असं जाणवलं की शरीर थकण्यापेक्षा मन थकलं की चिडचिड, तणाव, नैराश्य हे येतं. कदाचित सगळ्यांच्या बाबतीतही असंच असेल. मग विचार केला की मन थकल्यावर हे सगळे बदल जाणवतात. मग मनालाही थोडी विश्रांती दिली तर? “मनाची विश्रांती” म्हटल्यावर सुद्धा बरं वाटलं. तर अहो मग खरच विश्रांती दिली तर किती बरं वाटेल. पण ही विश्रांती कशी द्यायची? आणि किती द्यायची? अहो ज्या कामामुळे थकवा,आणि ताण येतो त्या कामापासून काही काळ, काही दिवस मनाने थोडं लांब जायचं. मग त्या दिवसात आपल्या रोजच्या कामापासून फक्त लांब जायचं नाही तर आपल्या कामापेक्षा अगदी वेगळं काम करायचं. ज्याची आपल्याला आवड आहे, छंद आहे, ते काम दिवसभरात कधीही करावं. जे मनापासून करण्याची इच्छा होती ते काम करायचं. मग अगदी झाड लावणं, मातीचा किल्ला करणं किंवा नुसतं झोपणं, टीव्ही पाहणं अशी कोणतीही काम करावी. या सगळ्यांमुळे मनावरचा ताण जाईल आणि रोजच्या कामापेक्षा अगदी वेगळं आपल्याला आवडीचं काम केल्याने आपला उत्साह सुद्धा वाढेल. आणि आपण पुन्हा आपले रोजचं काम उत्साहात करू. खरंतर कामाच्या ठिकाणाहून घरी गेल्यावर चप्पल, बूट दारात काढल्यावर आपलं कामआणि कामाचं पदही दारात ठेवून, घरात, घरातील नात्याप्रमाणे राहिल्यास कामाचा ताण येणारच नाही. आणि आलाच तर आधी सांगितल्याप्रमाणे करून बघाच. घरच्यांना वेळ द्या. घरच्यांबरोबर बाहेर फिरा. आणि पुन्हा उत्साहात आपल्या कामाला लागा. बदल हा जीवनाचा अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे रोजच्या कामात बदल करूया आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपल्या रोजच्या कामाला लागूया.

अहो, अगदी आपल्या घरात किती वाट्या, भांडी, ताट आहे हे मोजा. आपल्याच घराला थोडंसं आवरून बघा. घराचं रूप बदललेलं दिसेल. आपल्याच भांड्यांना अगदी वाटी, ग्लास, चमचे घासून बघा बरं. अहो यात मानसिक थकवा अजिबात येत नाही. तसंच रुमाल किंवा अगदी लहान ओढणी, नॅपकिन धुवून बघा. तुम्हाला वाटेल कामाच्या ठिकाणी माझा एवढा मोठं पद आणि मी कपडे ,भांडे का करू? अगं सखे हे रोज नाही करायचं. आपल्याला बदल म्हणून, गंमत म्हणून करा. यात व्यायामही होतो तणावही जातो. शिवाय हे काम रोज करणाऱ्या बायकांची किंमत कळते. आणि मग वाटतं आपलं रोजचं कामच बरं. कारण त्याची आपल्याला सवय झालेली असते. म्हणजेच थोड्याशा बदलाने आपण पुन्हा आपल्या कामाकडे आनंदाने वळतो.

याच प्रकारे बंधूही करू शकतात. आपल्या बालपणीची आवड जपा. संध्याकाळी फिरायला जा. किंवा आपल्या मित्र परिवाराबरोबर फिरा, गप्पा मारा. घरात कामात मदत करा. त्या निमित्ताने घरची स्त्री घरातली सकाळपासून रात्रीपर्यंत किती कामं आनंदाने करते हे ही लक्षात येईल.आपण बाहेर गावाला गेल्यावर रोज हॉटेलमधील खाऊन सुद्धा नंतर घरचं जेवण खावसं वाटेल.कारण यात प्रेम, स्वच्छता आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आवडीनुसार तेल, तिखट, मीठ, गोड असतं. असंच पुन्हा आपल्याला आपलं रोजच काम चांगलं वाटेल. त्यासाठी त्या कामापासून थोडा लांब राहा.जसं बाहेर गावाला जायला आपल्याला खूप आवडतं पण तेही थोडेच दिवस, कारण पुन्हा आपल्याला आपलं घरच आवडतं. अगदी तसंच आहे की रोजचं काम करून करून आपल्याला कंटाळा येतो पण थोडं कामापासून लांब आलो की पुन्हा आपल्याला आपलं काम आवडायला लागतं.असं म्हणतात ना की ‘विरहानं प्रेम वाढतं’ हे केवळ माणसांच्याच बाबतीत नाही बर का. अगदी कामाच्या बाबतीतही असं होऊ शकतं. कामाच्या विरहाने कामाबद्दलचं आपलं प्रेमही वाढेल हे मात्र नक्की. बघा तर मग थोडासा आपल्या रोजच्या कामात बदल करा. आणि पुन्हा आपल्या रोजच्या कामाला आनंदाने लागा.

सौ. सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा