You are currently viewing देवगडातील देऊळवाडी मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर ओंबळ रस्त्याच्या कामाचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगडातील देऊळवाडी मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर ओंबळ रस्त्याच्या कामाचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन

आम. नितेश राणेंकडून रस्ता नूतनी करणासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

 

देवगड :

देवगड तालुक्यात आम. नितेश राणे यांनी देऊळवाडी मुख्य रस्ता ते पावणाई मंदिर ओंबळ रस्त्याच्या नूतनी करणासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता त्याचे भूमिपूजन श्री. संदीप साटम यांच्या हस्ते श्री.बंड्या नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ओंबळ सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार, ग्रा.सदस्य सौ.संचित पवार, संजय पवार, अजित पवार, अनिल नवले, प्रकाश जाधव, अंकिता पवार, भालचंद्र पवार, चंद्रकांत पवार, प्रकाश पवार, शरद पवार, महेश पवार, प्रशांत पवार, सुरेंद्र पवार, अशोक पवार, प्रेमा पवार, तुकाराम परब, सुरेश पवार, सागर पवार ई.अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा