सावंतवाडी
विरोधीपक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय आणि संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार कुटुंबीयांनी वाढवला आहे. अजित दादा पवार यांचे पक्ष वाढवण्यात मोठे योगदान आहे.
अजितदादांचा मीही चाहता आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली सिंधुर्गातही त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी आला. आता ते भाजपसोबत जाणार अशा वावड्या उठल्या आहेत याबाबत पवार कुटुंबीयांचे जवळचे असलेले भोसले म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय आणि संमतीशिवाय अजित पवार कुठेही जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे. ही विचारसरणी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय संघर्षा बाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे .त्यात 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी आगामी काळात घडतील या पार्श्वभूमीवर अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठत आहेत परंतु शरद पवार यांच्या संमतीशिवाय ते कुठेही जाणार नाही असे भोसले यानी स्पष्ट केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता भोसले यांनी व्यक्त केली आहे.