देवगड
विजयदुर्ग रोड वरील पत्रा दुकान स्टॉप वर मंगेश बाणे या 35 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला आहे पायावर जोरदार पंजा मारल्याने तो जखमी झाला आहे त्याला पडेल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले
ही घटना 17 एप्रिल रोजी आठच्या सुमारास घडली मंगेश बाणे हा पडेल खालची वठार वाडी या भागात राहतो
नेहमीप्रमाणे तो घरी जात होता मात्र पत्रा दुकान या स्टॉप जवळ तीन बिबटे त्याच्या मोटरसायकल जवळ आडवे आले व त्यातील एका बिबट्याने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे हे बिबटे वारंवार लोकांना दिसत असून त्यांची दखल वनविभागाने घेऊन तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी होत आहे