You are currently viewing कोकणातील टॅलेंट स्पर्धा परिक्षेसाठी पुरक… प्रा. राजाराम परब…

कोकणातील टॅलेंट स्पर्धा परिक्षेसाठी पुरक… प्रा. राजाराम परब…

कोकणात प्रचंड बुद्धिमत्ता आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात कोकणी माणूस आपल्या बुध्दीचातुर्याच्या जोरदार आपला प्रभाव सिद्ध करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोर्डाच्या निकालात सातत्याने आपला सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल आहे. असे असले तरी स्पर्धा परीक्षेमध्ये आणि अधिकारी निर्माण करण्यामध्ये आपण खूपच मागे आहोत. म्हणूनच या जिल्ह्यातील युवकांनी आपल ध्येय निश्चित करुन स्वप्नाचा पाठलाग करून यश खेचून आणलं पाहिजे त्यासाठी परफेक्ट अकादमीच्या माध्यमातून आपण सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचे प्रतिपादन परफेक्ट अकादमीचे प्रा. राजाराम परब यांनी केले. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माठेवाडा,सावंतवाडी येथे कार्यरत असलेल्या जिजाऊ स्पर्धा परीक्षा मोफत वाचनालयाच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी जिजाऊ च्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी या मोफत वाचनालयाचा लाभ घेऊन यूजीसी नेट परिक्षेत यश प्राप्त केलेल्या लक्ष्मण मंगेश तळवणेकर या विद्यार्थ्यांचा सौ. अर्चना घारे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धा परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रूपेश पाटील यांनी सकारात्मक विचार घेऊन स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे गेले पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात वाचनालयाचे सल्लागार आणि अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी या मोफत वाचनालयाच्या गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला तसेच या वाचनालयाचा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी लाभ घेत असुन वाचनालयाच्या वतीने त्यांना आवश्यक सर्व पुस्तके व सुविधा जिजाऊ च्या माध्यमातून उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला श्री महादेव लिंगवत,कु.पुनम पार्सेकर, श्रीमती प्रज्ञा परब, सौ. नमिता परब, विविध स्पर्धा परिक्षेला बसलेले विद्यार्थी उपस्थित होते. सुञसंचालन समुपदेशक सौ. अर्पिता वाटवे यांनी केले तर आभार श्री विश्वनाथ सनाम यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा