सावंतवाडी
झाराप झीरो पॉइंट येथे भरधाव डंपरने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ महिला लिपिक ठार झाली आहे. सुषमा गणपत नेमण ( वय – ५२, मातोंड- पेंडूर) असे तिचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना समजतात वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती.
याबाबत अधीक माहिती अशी की, नेमण या नेहमीप्रमाणे जिल्हा न्यायालय येथून आपले काम आटपून आपल्या सहकाऱ्यासमवेत झाराप झिरो पॉईंट येथे आल्या होत्या. तेथे त्यांना नेण्यासाठी त्यांचा मुलगा येणारं होता. यावेळी बांदयाहून कुडाळच्या दिशेने भरधाव येणारा डंपर सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी आला असता. यावेळी डंपरची नेमण हिला धडक बसली. यात ती ठार झाली. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर तिथेच सोडून पलायन केले. तिला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना समजतात जिल्हा बार असोसिएशन तसेच सावंतवाडी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसरात धाव घेतली.