You are currently viewing ठाकरे गटाच्या देवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

ठाकरे गटाच्या देवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेविका मिताली सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष विश्वासात न घेता अंधारात ठेवून काम करत असल्याचा गंभीर आरोप करत भाजपला साथ दिल्याने देवगड मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत देवगड जामसांडे नगर विकास समिती या भाजपाच्या नोंदणीकृत गटाला पाठिंबा, समर्थन देत असल्याचे पत्र सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने देवगड नगरपंचायत मधील सत्तांतर आता अटळ झाले आहे. तसेच देवगड जामसांडे नगरपंचायतीमधील महाविकास आघाडी या गटाला दिलेला पाठिंबा काढून घेत मिताली सावंत यांनी नगरपंचायत मधील भाजपा च्या असलेल्या देवगड जामसांडे नगर विकास समिती ला पाठिंबा जाहीर करत उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी ठाकरे गटाला धोबीपछाड दिला आहे. महाविकास आघाडीचे सदस्य मला कोणत्याही कामात सहभागी करून घेत नाहीत. अनेक गंभीर विषयांमध्ये मला अंधारात ठेवले जाते. असा घनाघाती आरोप सावंत यांनी केला आहे. या सर्व प्रकारांमुळे मला मानसिक त्रास होत असल्याचेही त्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी देवगड शहराच्या व त्या निवडून येतात त्या 10 नंबर प्रभागाच्या मधील जनतेच्या विकासासाठी त्यांनी भाजपा पुरस्कृत देवगड जामसांडे नगर विकास समितीला पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता देवगड नगरपंचायत मध्ये सत्तांतर अटळ झाले असून, आमदार नितेश राणे यांनी देवगड शहराच्या राजकारणात हा मारलेला मास्टर स्ट्रोक येत्या काळात नगरपंचायत मधील सत्तांतरण कायदेशीर प्रक्रियेनंतर बदलून टाकणारा ठरणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेत ठाकरे गटाने या नगरपंचायती सत्ता मिळवली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा