*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सन्मा.सदस्य तंत्रज्ञ श्री.मिलिंद पगारे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी काशिनाथ महाजन यांची काव्यरचना*
समाजात काही माणसे कुठलाही गाजावाजा न करता एकटेच समाजसेवा करत असतात. आपली दखल कुणी घ्यावी, असेही त्यांना वाटत नाही. अशाच एका साकव्य अवलियाचे व्यक्तीचित्रणं या कवितेत रेखाटले आहे.
*एक अवलिया*
(वृत्त लवंगलता)
जगावेगळा एक अवलिया, जग हे जाणत नाही
निर्लोभी हा लोकमताची, तमा बाळगत नाही
जनकल्याणासाठी त्याची, धडपड सदैव चाले
नेत्रदान अन् देहदानही, जगास अवगत झाले
तऱ्हेतऱ्हेच्या उपक्रमांची, गणना करवत नाही
निर्लोभी हा लोकमताची, तमा बाळगत नाही
अज्ञानाचे हरण कराया, वेष यमाचा करतो
सायकलीला रेडा बनवत, वस्ती वस्ती फिरतो
कुणी निंदती हसती त्याला, मुळीच लाजत नाही
निर्लोभी हा लोकमताची, तमा बाळगत नाही
टाकाऊचे टिकाउ करणे, सहजच जमते ज्याला
हासत खेळत मुले शिकवतो, हर्ष लाभतो त्याला
गाणी गोष्टी जादू करतो, मन कंटाळत नाही
निर्लोभी हा लोकमताची, तमा बाळगत नाही
पासष्टीच्या वयात याने, अठरा तास श्रमावे
दाम कधीही मागत नाही, दिले तेवढे घ्यावे
नाव पगारे मिलिंद यांचे, जगात गाजत नाही
निर्लोभी हा लोकमताची, तमा बाळगत नाही
… काशीनाथ महाजन
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-