सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश अभय ओक
ओरोस
पक्षकाराचे भवितव्य कोर्टात ठरत असते. वकिलांनी सामान्य नागरिकांसाठी काम करायचे असते. स्वातंत्र्या नंतर घटनेने दिलेले अधिकार टिकविण्यासाठी काम करायचे आहे. नवोदित वकिलांनी अभ्यास केला पाहिजे. वाचन केले पाहिजे. आत्मचरित्र वाचली पाहिजे. तरच वकील म्हणून प्रगल्भ होवू शकता. तसेच शिस्तेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने १ जानेवारी २०२० नंतर वकिलीची सनद मिळविलेल्या नवोदित वकीलांसाठी क्लेप आणि ब्लेप या मार्गदर्शन शिबिराचे तसेच सिविल अँड क्रिमिनल प्रॅक्टिस या पुस्तिकेच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेश सोनप, न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश भारत देशपांडे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेश तावडे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ऍड अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष ऍड संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे ऍड जयंत जायभावे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका, प्रमुख व्याख्याता हॅरोल्ड डिकॉस्टा, श्रीकांत कानेटकर, सिंधुदुर्ग जिल्हा बार कौन्सिल अध्यक्ष पी जी नाईक, रत्नागिरी अध्यक्ष दिलीप धारिया, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, विवेक गाडगीळ, आशिष देशमुख, गजानन चव्हाण, अहमद खान पठाण, सतीश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विवेक मांडकुलकर, सचिव यतिश खानोलकर, उपाध्यक्ष निता गावडे, अमोल सामंत, खजिनदार गोविंद बांदेकर, अक्षय चिंदरकर, राजेश परुळेकर, संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.