सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ , या युनियनला भाजपाचा पुर्ण पाठींबा — राजन तेली
वेंगुर्ले आगार येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली साहेब तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले . या वेळी सिंधुदुर्ग विभागाचे नेतृत्व करणारे श्री रोशन तेंडोलकर , वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण , सावंतवाडी आगाराचे प्रशांत माडकर , वेंगुर्ला आगार सचिव- दाजी तळवनेकर , उपाध्यक्ष- सखाराम सावळ , कार्याध्यक्ष- आशिष वराडकर , मिलिंद मयेकर , महादेव भगत , मनोहर वालावलकर , संजय झोरे , विनायक दाभोलकर , तेजस जोशी , सचिन सावंत , आशिष धावडे , P.D.मोहिते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील ही एस्.टी.कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये स्थापन करण्यासाठी सहकार्य केले जाईल . तसेच राज्यात शिंदे – फडणवीस सरकार असल्याने एस्.टी.कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले . तसेच महीलांना एस्.टी.प्रवासात ५० % सवलत दिल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नांत वाढ झाल्यामुळे तोट्यात असलेले महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारत असून , लवकरच सिंधुदुर्गातील आगारामध्ये नविन गाड्या येणार असल्याचे सांगीतले . तसेच यासाठी पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण पाठपुरावा करत असल्याचे सांगीतले.
या उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी , साईप्रसाद नाईक , सारीका काळसेकर , शितल आंगचेकर , पुनम जाधव , वसंत तांडेल , बाबली वायंगणकर , चंदु मळीक , पिंटू सावंत , भुषण सारंग , शेखर काणेकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , नितीश कुडतरकर , अंकीता देसाई , गवस इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .