You are currently viewing वंदन महामानवला

वंदन महामानवला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वंदन महामानवला*
———————————————-

युगायुगाच्या अंधारातून तुम्ही फुलविले नंदनवन
बाबासाहेब मनोभावे तुम्हास करतो मी वंदन
विद्या आणि संविधानाचा
हाती दिधला प्रखर दिवा
कर्दमात पिचलेल्याना
दावियला तुम्ही सूर्य नवा
आयुष्य सारे अर्पण केले वेचून अवघे तनमन धन
बाबासाहेब मनोभावे तुम्हास करतो मी वंदन
प्रश्न कोणते सुटून जाती
रणांगणातील युद्धाने
समता आणि शांती,करुणा
तुम्हा शिकविली बुद्धाने
जगास साऱ्या गंधित करते ‘पंचशील ‘ चे हे चंदन
बाबासाहेब मनोभावे तुम्हास करतो मी वंदन
दुःखी पीडित ही वस्ती
कात अताशा टाकत आहे
आभाळाचा वेध घ्यायला
जोमाने सरसावत आहे.
मनामनातुन उमटत आहे ‘ जय भीम , जयभीम’ चे स्पंदन
बाबासाहेब मनोभावे तुम्हास करतो मी वंदन

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित
14.04.2023

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा