मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर यांचा इशारा
सावंतवाडी — मळेवाड भटवाडी येथे गव्यारेड्यांकडून होणारे नुकसान त्वरित थांबवा अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा मळेवाड कोंडूरे सरपंच मिलन पार्सेकर यांनी दिला आहे.
मळेवाड भटवाडी येथे मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली असून गेले आठ ते दहा दिवस मोठ्या प्रमाणात गव्या रेड्यांचे कळप या शेतीत घुसून शेतीचे नुकसान करत आहेत.याबाबत वनविभागाला वारंवार कल्पना देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही उपाययोजना किंवा कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले मिरची पीक हे वाया जाणार आहे.यामुळे वन विभाग कडून या गवरड्यांकडून होणारे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर यांनी केली आहे.येत्या दोन-तीन दिवसात यावर कोणतीही कार्यवाही न केल्यास वनविभाग च्या समोर शेतकऱ्यां समवेत नुकसान झालेले मिरचीची झाडे घेऊन आंदोलन करण्याचा इशारा पार्सेकर यांनी दिला आहे.
तसेच घोडेमुख पेंडूर व न्हावेली याही परिसरात गव्या रेड्यांकडून मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान केले जात असून पेंडुरचे माजी सरपंच संतोष गावडे व विद्यमान न्हावेली सरपंच अंकित धाऊसकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा वनविभागला दिला आहे.यामुळे गव्या रेड्याकडून नुकसान होऊ नये यासाठी कोणती ठोस उपाययोजना वन विभाग कडून केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.