You are currently viewing कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने देश अग्रेसर…

कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने देश अग्रेसर…

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

 मुंबई

जर्मनी, फ्रान्स यांसह काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून काही भागात नव्याने लॉकडाऊन जाहीर झाले आहे. मात्र डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक व सेवाभावी व्यक्ती यांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            धारावी तसेच इतरत्र कोरोना प्रकोपाच्या काळात समाजकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, भामला फाउंडेशन संस्थेच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

            सेवा हा शब्द उच्चारण्यास अतिशय सोपा आहे; परंतु सेवा करणे अतिशय कठीण आहे.  मात्र भारतातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर समाजसेवकांनी कोरोना काळात आपण प्रत्यक्ष भगवंताची सेवा करीत आहोत या भावनेने कार्य केल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =