*झाराप सरपंच दक्षता मेस्त्री,उपसरपंच मंगेश गावकर, ग्रा.प.सदस्य विपुल मयेकर यांचा शिवसेनेत प्रवेश*
कुडाळ / झाराप :
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, व ग्रा. प. सदस्य विपुल मयेकर यांनी आज आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेत येणाऱ्यांचा सन्मान कायम ठेवला जातो. एकीकडे शिवसेना सोडून अनेक जण जात आहेत. मात्र तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. झाराप हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गतवेळी झाराप गामपंचायत शिवसेनेकडे आल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली. आता सत्ता नसली तरी या गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना सामान अधिकार मिळवून दिले आहे. मात्र सद्या देशात घटना बदण्याचे काम केले जात आहेत. ज्या आमदार, खासदार यांच्या चौकशा सुरु होत्या. भ्रष्टाचाराचे आरोप होत होते ते आमदार ,खासदार भाजपमध्ये गेल्यानंतर ते शुद्ध झाले.आपल्या देशात लोकशाही टिकली पाहिजे यासाठी कोणावर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने पेटून उठले पाहिजे.असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
*जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले,* कोणीही पक्ष सोडून गेले तरी शिवसेना संपणार नाही. संघर्ष शिवसेनेला नवीन नाही, संघर्षात शिवसेना अधीक जोमाने वाढते. झाराप सरपंच,उपसरपंच यांच्या शिवसेना प्रवेशावरून हे प्रकर्षाने दिसून येते.प्रवेश कर्त्यांना शिवसेनेत मान सन्मान दिला जाईल. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून दिले. आता त्यांच्या कठीण काळात आपण त्यांना साथ दिली पाहिजे. पक्ष वाढीसाठी सर्वानी मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, अनुप नाईक,विभाग प्रमुख बंड्या कुडतरकर,अशपाक कुडाळकर,अजित करमलकर, तनया मांजरेकर, विशाखा गोडे, संजीवनी पेंडुरकर, तात्या मेस्त्री, अनिकेत तेंडोलकर, विष्णू माणगावकर,यज्ञेश गोडे,चंदू मुंडये,अमोल तेली,मनीष मेस्त्री आदींसह शिवसैनिक व झाराप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.