वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सागरतीर्थ समुद्रकिनारी सुंदर असे वाळूशिल्प रेखाटून त्यांना मानवंदना दिली आहे.
या वाळू शिल्प कलेतून रविराज चिपकर यांनी आपली कला साकारली आहे. किनाऱ्यावरील हे वाळू शिल्प पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत होते.